मध्य रेल्वेचे जीएम संजीव मित्तल यांच्याकडून निरीक्षण

भुसावळ : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक (जीएम) संजीव मित्तल यांनी शनिवारी भुसावळ विभागातील मनमाड ते ईगतपुरी या मार्गाची विंडो पाहणी केली. त्यांच्यासमवेत डीआरएम विवेककुमार गुप्ता होते. अन्य उच्च पदस्थ अधिकारी त्यांच्या समवेत होते. मध्य रेल्वेच्या नवीन जीएमपदी मित्तल यांनी पदभार स्विकारल्यावर त्यांनी नागपूर विभागाला शुक्रवारी भेट दिली. नागपूर येथून जातांना शनिवारी पहाटे पाचला हटीया एक्स्प्रेसने ते मुंबईकडे रवाना झाले. जातांना त्यांनी भुसावळ विभागातील मनमाड ते ईगतपुरी दरम्यान रेल्वे मार्गाची विंडो पहाणी केली. डीआरएम गुप्ता व अन्य उच्च पदस्थ अधिकारी त्यांच्या समवेत होते. डिसेंबर महिन्यात भुसावळ येथे जीएम मित्तल भेट देणार आहे.

