हद्दपारीचे उल्लंघण : जळगावात आरोपी जाळ्यात


जळगाव : हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघण करीत गावात फिरणार्‍या रईस शमशेरखान पठाण (गेंदालाल मिल, जळगाव) यास शनिवारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, शरद भालेराव, रामकृष्ण पाटील आदींनी ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात देण्यात आले.


कॉपी करू नका.