धक्कादायक : एकाच कुटुंबातील चौघांची हत्या


रांची :  एकाच कुटुंबातील चार जणांची गळा कापून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटन झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात शुक्रवारी रात्री घडली. मृतांमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. सिंहभूम जिल्ह्यातील हाटगम्हरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केनपोसी गावाजवळ चौघांचे मृतदेह आढळले आहेत. ग्रामस्थांनी सकाळी शेतामध्ये चार जणांचे मृतदेह पाहिले. त्यानंतर गावात खळबळ उडाली. ओनामुनी खंडाईत (26), त्यांची पत्नी मानी खंडाईत (22), त्यांचा मुलगा मुगरू खंडाईत (6) तसेच भाऊ गोबरो खंडाईत (22) अशी केनपोसी गावातील मयतांची नावे आहेत. सर्वांची कुर्‍हाडीने कापून निर्घृण हत्या करण्यात आली असून सर्वांच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. मृतांमध्ये एका सहा वर्षीय बालकाचाही समावेश आहे. दरम्यान, हे हत्याकांड कशामुळे घडवण्यात आले ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !