धक्कादायक ! : रेल्वे प्रवाशाचा मोबाईल लांबवणार्‍या उपनिरीक्षकाचे निलंबन


तिरुवनंतपूरम : मयत रेल्वे प्रवाशाचा मोबाईल लांबवल्याप्रकरणी एका उपनिरीक्षकाला निलंबीत करण्यात आले आहे. तिरुवनंतरपूरम येथील माजी एएसआय आणि सध्या कोल्लमच्या चेथन्नूर येथे कार्यरत असलेले पीएसआय ज्योती सुधाकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. अरुण जेरी हे प्रवासी 18 जून 2021 रोजी रेल्वे मृत्युमुखी पडले होते. त्यावेळी, घटनास्थळावर मृतांचे नातेवाईक ओळख परेडसाठी आले असता, त्यांचा मोबाईल आणि काही वस्तू गायब असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी पोलिसांनी याबाबत विचारणा केली. त्यावेळी कदाचित सामान ट्रेनखाली पडला असेल, असे सांगण्यात आले त्यामुळे, नातेवाईकांनी केरळचे डीजीपी आणि सायबर सेल पोलिसांकडे मोबाईल फोन गायब झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर, सायबर सेलने तपास केला असता, कोल्लमच्या चेथन्नूर येथे मोबाईल सध्या सक्रीय असल्याचे निदर्शनास आले. तसेच, या फोनचा वापर चेथन्नूरचे पोलीस उपनिरीक्षक ज्योती सुधाकर यांनी केल्याचेही समोर आले. ज्यावेळी, अरुण जेरी यांचे अपघाती निधन झाले होते, तेव्हा मंगलापूरम ज्योती सुधाकर यांच्या नेतृत्त्वात या घटनेचा तपास पूर्ण झाला होता. या तपासदरम्यानच सुधाकर यांनी हा मोबाईल चोरल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी, मोबाईल फोन सापडलाच नसल्याचे त्यांनी रेकॉर्डमध्ये दाखवले होते. ज्योती सुधाकर यांच्याविरुद्ध पुढील तपास सुरू असल्याचे तिरुवनंतपूरम रेंजच्या डीआयजींनी सांगितले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !