दहिगावात बालिकेवर अत्याचार : नराधम तरुणाची पोलीस कोठडीत रवानगी
यावल : तालुक्यातील दहिगाव येथे साडेतीन वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना शुक्रवार, 8 रोजी घडली होती. या प्रकरणी कैलास प्रल्हाद पाटील (25) यास अटक करण्यात आली होती. आरोपीला रविवारी भुसावळ अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता न्या.एस.पी.डोरले यांनी मंगळवार, 12 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.