संतापजनक ! ; पित्यासह 28 नराधमांचा तरुणीवर बलात्कार
ललितपूर : पिता-पूत्रीच्या नात्याला कलंक लावत नराधम बापाने आपल्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला असून अन्य 27 जणांनी देखील पीडीतेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यात घडली. पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्या तरुणीने समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या काही नेत्यांचीही नावे घेतली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आपल्या तक्रारीमध्ये तरुणीने आरोप केला की, सहावीत शिकत असताना वडिलांनी तिला अश्लील व्हिडिओ दाखवून शारीरीक संबंध ठेवले आणि कुणालाही सांगितलं तर आईला ठार मारण्याची धमकी दिली. काही दिवसाननंतर नराधम बापाने गुंगीचे औषध देऊन एका महिलेच्या स्वाधीन केलं. त्या महिलेन तिला एका हॉटेलमध्ये नेल आणि तिथेही अज्ञातांकडून बलात्कार झाला.
नातलगांकडूनही बलात्कार
पुढचे अनेक महिने नवीन पुरुषांकडून तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी अमानुष पद्धतीने बलात्कार करण्यात आला. या सर्व नराधमांमध्ये तरुणीच्या वडिलांसोबत काही नातेवाईक आणि राजकीय नेत्यांचाही समावेश होता. दरम्यान, संबंध बनवायला नकार दिल्यास तरुणीला आईला जीवे मारण्याची धमकी दिली जायची. या धक्कादायक प्रकारामध्ये तिची आजीदेखील आरोपींना मदत करायची. ललितपूरचे एसपी निखील पाठक म्हणाले, ‘ही अत्यंत धक्कादायक घटना आहे आणि आम्ही अतिशय गांभीर्याने या घटनेचा तपास करत आहोत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




यांच्याविररोधात दाखल झाला गुन्हा
तरुणीच्या तक्रारीच्या आधारे ललितपूर पोलिसांनी मुलीचे वडील, सपाचे जिल्हाध्यक्ष, सपाचे शहराध्यक्ष, बसपाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेकांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. त्यांच्याविरोधात कलम 354, 376-डी, 323, 506 आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 5/6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.