जळगाव महापालिकेची सभा तहकूब


स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर भाजपाने केली सेनेची कोंडी

जळगाव : शिवसनेच्या स्विकृत नगरसेवक निवडीच्या मुद्यावरून भाजपने शिवसेनेची कोंडी गेल्यानंतर दोन्ही पक्षाचे सदस्य समोरा-समोर आल्यानंतर झालेल्या गदारोळानंतर अखेर शिवसेनेला सभा तहकूब करण्याची वेळ आली. महापालिकेची बुधवारी विशेष महासभा झाली.

निवडीवरून प्रचंड गदारोळ
जळगाव महापालाकित बुधवारी ऑनलाईन पद्धतीने विशेष महासभा महापौर जयश्री महाजन यांच्या अध्यक्षस्थानी झाली. उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त सतीश कुळकर्णी उपस्थित होते. महासभेत गटनेता पदावरून प्रचंड गोंधळ भाजप-शिवसेना सदस्यांमध्ये झाला. यावेळी शिवसेने दिपील पोकळे यांच्या नावाच्या गटनेता पदाची नावावरून भाजपच्या सदस्यांनी जोरदार याला विरोध केला. भाजपचे अ‍ॅड.शुचिता हाडांनी गटनेता पद भाजपचे असून शिवसेनेने चुकिच्या पद्धतीने निवड केली असून विभागीय आयुक्त कार्यालयात भाजपच्या गटनेत्यांची नोंद आहे त्यामुळे ही निवड चुकीची आहे असल्याचे सांगत प्रचंड गोंधळ झाला. यावेळी भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे, भगत बालाणी, जितेंद्र मराठे, डॉ. अश्विन सोनवणे यांनी जोरदार शाब्दीक हल्ले शिवसेना सदस्यांवर केले.





गटनेता निवडीतील गुंतागुंतीमुळे महासभा तहकूब : लढ्ढा
भारतीय जनता पक्षाच्या 29 सदस्यांनी दिलीप पोकळे यांना गटनेता निवडीची संमती दिली होत तर भाजपतर्फे भगत बालाणी यांनी गटनेत पदाचा दावा केला आहे. परीणामी याबाबत कायदेशीर गुंतागुंत निर्माण झाल्यानेच आजची महासभा तहकूब करण्यात आल्याचे प्रतिपादन माजी महापौर तथा शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य नितीन लढ्ढा यांनी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !