भुसावळात पोलिसांना धक्काबुक्की : आरोपी प्रशांत ठाकूरला अटक


भुसावळ : शहरातील हनुमान नगरात पोलिसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी एलसीबीच्या पोलिस पथकाने प्रशांत उर्फ गोलू युवराज ठाकूर याच्या मुसक्या शनिवारी रात्री आवळल्या. संशयीत ठाकूर हा घटना घडल्यापासून पसार झाला होता, याला बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. हनुमान नगरात रात्री उशीरा गरबा खेळला जात असतांना पोलिसांनी त्यांना मनाई केली असता,पोलिसांशी वाद घालून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी ठाकूर पसार झाला होता, त्याला पोलिसांनी त्याला हनुमान नगरातून ताब्यात घेत बाजारपेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. जळगाव गुन्हे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी प्रशांतला ताब्यात घेतले. ही कारवाई सहायक फौजदार अशोक महाजन,लक्ष्मण पाटील, श्रीकृष्ण देशमुख, रणजित जाधव, किशोर राठोड, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांनी केली. या प्रकरणी पोलिसांनी या गुन्ह्यातील तीन संशयीतांना अटक केली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !