भुसावळात व्यवसायासाठी घरगुती गॅस सिलिंडर वापरले : चायनीज विक्रेत्याविरूध्द गुन्हा दाखल


भुसावळ : भुसावळ शहर पोलीस ठाण्यासमोरील आणि न्यायालयाच्या भिंतीजवळ असलेल्या जेठालाल चायनीज सेंटर या दुकानावर घरगुती गॅस सिलेंडर व्यवसायासाठी वापरल्याने किरण ज्ञानेश्वर करडे यांच्याविरूध्द शहर पोलिसांनी जीवनावश्यक वस्तू कायदा कलमान्वय गुन्हा दाखल करून व्यावसायीकाला अटक केली. त्यास रविवारी न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

विक्रेत्यांमध्ये उडाली खळबळ
भुसावळ न्यायालयाच्या भिंतीजवळ असलेल्या जेठालाल चायनीज सेंटर या दुकानात घरगुती वापरासाठी असलेले सिलेंडर हे व्यावसायासाठी वापरात घेतले होते. शहर पोलिसांनी या प्रकरणी अचानक तपासणी केली असता, हे सिलेंडर मिळून आले. पोलिस गणेश घुगे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून करडे याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. करडे याला रविवारी न्यायालयात हजर केले असता, सोमवारपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. करडे याला पुन्हा सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप दुनगहु पुढील तपास करीत आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे घरगुती सिलेंडर वापरणार्‍या व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी विशेष मोहिम राबविण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !