शेत माल चोरणारी टोळी गुन्हे शाखेच्या जाळ्यात


धुळे : शेती माल चोरणारी टोळी धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकली आहे. टोळीकडून पोलिसांनी 20 लाख 47 हजारावर किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिंचपाडा (ता.साक्री) येथील संशयित सतीश छोटीराम गायकवाड व त्याच्या काही साथीदारांकडून शेतीमाल चोरी होत असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याअनुषंगाने शोध घेताना शनिवार, 16 रोजी सतीश गायकवाड हा त्याच्या साथीदारांसह धुळे शहरातील अकबर चौकात विना नंबर प्लेटच्या दुचाकीसह उभा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पथकाने सतीश गायकवाड (रा. चिंचपाडा, ता. साक्री), विश्वास अशोक अहिरे (रा.अनकवाडी, ता. धुळे) यांना दुचाकीसह ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी साक्री व धुळे तालुका हद्दीत साथीदार लक्ष्मण काळू सूर्यवंशी (रा.तोरणकुडी, ता.साक्री), अनिकेत गंगाराम बहिरम (रा. बोधगाव, ता. साक्री), अण्णा श्रीराम गायकवाड (रा. चिंचपाडा, ता. साक्री) यांच्या मदतीने कांदा, कापूस, लोखंडी सळई तसेच दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला. चोरलेला कांदा मालेगाव तालुक्यातील मुंगसे मार्केटमध्ये विकल्याचे त्यांनी सांगितले.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !