अज्ञात दुचाकीस्वाराच्या धडकेत जि.प.तील महिला कर्मचारी जखमी
जळगाव : जिल्हा परीषदेत नोकरीस असलेल्या महिला कर्मचार्याच्या दुचाकीची जोरदार धडक लागल्याची घटना आकाशवाणी चौकात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. संगीता राजेश सुरळकर (42, रा.नवजीवन सुपर शॉपच्या मागे) ह्या जिल्हा परीषदेत नोकरीला आहे. सुरळकर या 18 ऑक्टोबर रोजी कामावरून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीने (एम.एच.19 सी.सी.7314) आकाशवाणी चौकातून घराकडे जात होत्या. यावेळी एका अनोळखी दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात संगीता सुरळकर यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. दरम्यान, त्यांना धडक देणारा दुचाकीस्वार घटनास्थळावरुन पसार झाला. याप्रकरणी संगीता सुरळकर यांच्या फिर्यादीवरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक फौजदार पुरूषोत्तम वागळे तपास करीत आहेत.

