किनगावात 70 वर्षीय वृध्देचा मृत्यू : घातपाताचा कुटुंबाला संशय


यावल : तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील 70 वर्षीय वृध्द महिलेचा राहत्या घरात संशयास्पदरीत्या मृतदेह आढळला. मंगळवार, 19 रोजी ही घटना उघडकीस आली. मयत वृद्धेच्या अंगावरील दागिने नसल्याने घातपात झाल्याचा कुटुंबास संशय आहे. यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रुख्माबाई कडू पाटील (70) असे मयत वृद्धेचे नाव आहे.

वृद्धेच्या अंगावरील दागिने गायब
किनगाव बुद्रुक, ता.यावल येथील रहिवासी रुख्माबाई कडू पाटील (70) या मंगळवारी घरी त्यांच्या खोलीत एकट्याच होत्या व सांयकाळी कुटुंबातील सदस्यांनी घरी आल्यानंतर त्यांच्या खोलीत गेल्यानंतर रुखमबिाई मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या अंगावर असलेले सोन्या-चांदीचे दागिने मात्र आढळले नाहीत. कुटुंबीयांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी शामकांत श्रीराम पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरिक्षक जितेंद्र खैरणार यांनी स्वत:हा घटनास्थळी जावुन बारकाईने पंचनामा केला. तपास उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !