लोणी गावात पोलीस निरीक्षक अरुण धनवडेंसह कर्मचार्‍यांवर हल्ला : दोघांना अटक


अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्यानंतरची घटना : सहा हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल

जामनेर : अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केल्याची घटना तालुक्यातील लोणी या गावात गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली. या घटनेत पोलीस निरीक्षक अरुण धनवडेंना मुका मार लागला आहे.

अतिक्रमण हटवताना केला हल्ला
लोणी या गावात ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परीसरात लोणी गावातील काही लोकांनी अतिक्रमण केले असून त्याबाबत ग्रामपंचायत स्तरावर रीतसर तक्रार करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून बंदोबस्त मागवण्यात आला होता. पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, उपनिरीक्षक एस.पी.बनसोड, किरण शिंपी,विद्या छाडेकर, दिनेश मारवळकर अनिल सुरवाडे आदी कर्मचारी लोणी येथे गेले असता अतिक्रमणधारकांनी कारवाईस विरोध केला. अतिक्रमण हटवण्याबाबत सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली.




यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी दत्तू कडू उगले, ज्ञानेश्वर कडू उगले, सागर केशव उगले, महादू कडू उगले, भास्कर वाघ व पवन महादू उगले यांच्याविरोधात पहूर पोलिस स्टेशनला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी दडू व ज्ञानेश्वर उगले या दोघा भावांना अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !