चाळीसगाव शहरातील तरुण बेपता!
चाळीसगाव : शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाला जाऊन येतो, असे सांगून गेलेला तरुण अद्यापही घरी न परतल्याने शहर पोलीस स्थानकात तरुण हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. चाळीसगाव शहरातील पुंशी पेट्रोल पंपाच्या पाठीमागे राहणारा रविराज सुनील शिंपी (28, रा.धुळे रोड, चाळीसगाव) हा तरुण शेगावला दर्शन करून येतो असे घरच्यांना बुधवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास सांगून निघून गेला मात्र तो घरी न परतल्यामुळे घरच्यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोध घेतला परंतु तो मिळून न आल्यामुळे हरवल्याची खात्री झाल्यामुळे त्याचा भाऊ हर्षल सुनील शिंपी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात हरवल्याची फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

