नशिराबाद पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन दोघा बहिणींवर अत्याचार
नशिराबाद : नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्या अनुक्रमे 6 व 7 वर्षीय दोन अल्पवयीन मुलीवर संशयीत आरोपी राज संतोष कोळी (19, रा.जळगाव खुर्द, ता.जळगाव) याने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. नशिराबाद पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात पोस्कोसह कलमान्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. आरोपीला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे व सहकारी करीत आहेत.
