कथित प्राणीमित्राने छर्र्याच्या बंदुकीने घेतला मांजरीचा जीव
जळगाव : कथित प्राणी मित्राने मांजराच्या पिलाचा छर्र्याच्या बंदुकीने जीव घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास जळगावातील गिरणा पंपिंग रस्त्यावरील योजनानगरात घडली. मांजरीच्या पिलाने कोंबडीचे पिलू पकडून मारल्याचा राग आल्याने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले संशयित तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. योजनानगरात राहणार्या पुष्पराज बाणाईतने वर्षभरापासून मांजर पाळली असून महिन्याभरापूर्वी तिने पिलांना जन्म दिला तर त्यांच्या शेजारी राहणारे हेमराज सोनवणे यांनी कोंबडीची पिलं पाळली आहेत. मांजरीच्या पिलाने कोंबडीचे पिलू पकडून मारले, यांचा राग आल्याने हेमराजने घरातून छर्र्याची बंदूक आणून मांजरीच्या पिलाच्या डोक्यावर नेम धरून ठार मारली आणि मोठ्या मांजरीलाही मारुन टाकेल अशी धमकी बाणाईत कुटुंबीयांना दिली. या प्रकरणी पुष्पराज बाणाईत (वय 21) या तरुणाने फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.
