जळगाव शहरातून 30 हजारांची दुचाकी लंपास
जळगाव : जळगाव शहरातील शाहुनगरातील आश्विनी हॉस्पिटलसमोरून एकाची 30 हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. युवराज प्रकाश वाणी (29, रा.शाहुनगर, आश्विनी हॉस्पीटलसमोर, जळगाव) हे हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडील दुचाकी (एम.एच.19 सी.एम.4446) 16 ऑक्टोबर रात्री 11 ते 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास पार्किंगमध्ये लावली असताना चोरट्यांनी लांबवली. या प्रकरणी युवराज वाणी यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.

