चोरट्यांना भावली बुलेट : बोदवड शहरातून चोरी


बोदवड : शहरातील कुंभारवाडा येथील एकाची दीड लाख रूपये किंमतीची बुलेट चोरट्याने लांबवल्याने बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शेख इस्त्राईल शेख अस्लम (24, रा.कुंभारवाडा, बोदवड) यांनी आपल्याकडील बुलेट (एम.एच.19 डी.एन.2777) गुरुवार, 21 ऑक्टोबर रोजी घरासमोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बुलेट गाडी चोरून नेली. या प्रकरणी शेख इस्त्राईल शेख अस्लम यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदान सुधाकर शेजोळे करीत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !