जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकाच दिवशी दोन दुचाकी लंपास
जळगाव : जिल्हा पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंधी कॉलनी आणि विसनजी नगरातून एकाच दिवशी दोन दुचाकींची चोरी झाली. शहरात दुचाकी चोरींचे सत्र सुरू झाल्याने पुन्हा टोळी कार्यरत झाल्याची शंका असून पोलिस व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दुचाकी मालकांमध्ये पसरली भीती
पहिल्या घटनेत योगेश रमेश चौधरी (35, रा.आसोदा, ता.जि.जळगाव) हे फुल विक्रीचा व्यवसाय करतात. शुक्रवार, 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास त्यांनी विसनजी नगरातील गायत्री मंदीराजवळ (एमएच 19 बीटी 0889) क्रमांकाची दुचाकी पार्कींग केली. अज्ञात चोरट्यांनी 25 हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्या घटनेत सिंधी कॉलनी परीसरातील युनियन बँकसमोर संदीप बाळकृष्ण चौगुले (37, रा.विवेकानंद नगर, साई बाबा मंदिरासमोर, जिल्हापेठ) यांची दुचाकी (एम.एच.09 ए.डब्ल्यू 3834) पार्किंगला लावली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

-
तोतया पोलिसांनी वृद्धाच्या हातातील अंगठ्या लांबवल्या : चाळीसगावातील घटना
