चोपड्यात चोरट्यांची दिवाळी : बंद घरातून लॅपटॉपसह दागिने लांबविले


चोपडा : शहरातील विवेकानंद नगरातील यश पार्क भागात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील 54 हजार रूपये किंमतीचे लॅपटॉप, सोन्याचे आणि चांदीचे दागिने लांबवले. या प्रकरणी चोपडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांसाठी संधी
निखील विनायक पाटील (21, रा.विवेकानंद नगर, यश पार्क) हा तरूण आपल्या कुटुंबियासह राहतो. 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता ते घराला कुलूप लावून बाहेरगावी कामाच्या निमित्ताने गेले असता अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील लॅपटॉप, सोन्याचे आणि चांदीचे दागिने असा एकूण 54 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. निखील पाटील यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !