जळगावात मेडिकलला आग : दहा लाखांची औषधी खाक


जळगाव : शहरात औषध दुकानाला आग लागून सुमारे दहा लाखांची औषधी खाक झाली. रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ही आगल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाचे बंब तातडीने दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मेडिकलचे मालक मिलिंद आनंद चौधरी (रा. दांडेकर नगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सव्वा अकरा वाजता मेडिकलमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन ही आग लागली. बाहेर धूर व आगीचे लोळ येत असल्याचे लक्षात आल्यानंतर नागरीकांनी एकाच वेळी अग्निशमन दल व चौधरी यांना फोन करून माहिती दिली. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात महाबळ व गोलाणी मार्केट येथील अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले. पाण्याचा मारा करून वीस मिनिटात आग विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत दुकानातील आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !