विमा योजनेत गुंतवणुकीच्या नावाखाली तब्बल 61 लाखाचा ऑनलाईन गंडा
जळगाव :जळगाव शहरातील विद्यूत कॉलनी परिसरात राहणारे 88 वर्षीय वृध्दाला इन्शरन्समध्ये गुंतवणूकीचे आमिष दाखवत सुमारे 61 लाख 79 हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
विद्यूत कॉलनी परीसरात 88 वृध्द व्यक्ती हे आपल्या कुटुंबियासह राहतात. नोव्हेंबर 2017 मध्ये त्यांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर दीपीका शर्मा असे नाव सांगणार्या महिलेने संपर्क साधला. त्यांच्या संपर्क साधून स्टार हेल्थ अॅण्ड अलाईड इन्शुरन्स कंपनी लिमीटेड कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीचे नाव व लोगो असलेले बनावट कागदपत्रे तयार करून खरे असल्याचे भासविले. स्टार हेल्थ कंपनी इन्शुरन्स कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमीश दाखविले. संपर्कातील दीपीका शर्मा, अनुराग शर्मा आणि कमलाकरण रेड्डी असे नावे सांगणार्या व्यक्तींनी वृध्द व्यक्तींकडून वेळावेळी पैश्यांची मागणी करत सुमारे 61 लाख 79 हजार 593 रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी वृध्द व्यक्तीच्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहेत.

