रावेरात लाभार्थींना दिलासा : दिव्यांग, विधवा वृद्धापकाळ लाभार्थींच्या खात्यावर पेन्शन जमा
रावेर : दिवाळीच्या तोंडावर रावेर तहसील विविध योजनांच्या लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे. तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या पाठपुराव्यांमुळे तालुक्यातील गरीब, निराधार, विधवा महिलांचे पेशंन त्यांच्या खात्यावर मंगळवारी वर्ग करण्यात आले. केंद्राचे अनुदान यायला उशीर झाला असून इंदिरा गांधी योजनेच्या लाभार्थींना केवळ जुलै महिन्याचे अनुदान प्राप्त झाल्याने लाभार्थींना मोठा दिलासा मिळाला आहे.
लाभार्थींना मोठा दिलासा
विविध योजनेचे अनुदान जुलैपासून प्रलंबित असल्याने दररोज पेन्शनधारक चकरा मारत होते मात्र दिवाळीच्या तोंडावर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या पाठपुराव्यांमुळे केंद्र सरकारचे एक महिना तर राज्य सरकारचे दोन महिन्यांचे अनुदान प्राप्त झाले आहे. रात्रं-दिवस याद्या तयार करून मंगळवारी तालुक्यातील पेंशन धारकांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यात आले. यामुळे गरीब, निराधार, वृध्द विधवा महिलांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.संजय गांधी निवास योजनेचे नायब तहसीलदार संजय तायडे, अवल कारकुन शिवकुमार लोळपे, एस.एफ.तडवी, पुरूषोत्तम महाजन यांनी बिल तयार करण्याचे काम केले.

या लाभार्थींना मोठा दिलासा
संजय गांधी योजनेत येणार्या सर्व जनरलसाठी दोन महिन्यांचे अर्थात जुलै व ऑगस्ट महिन्याचे अनुदान प्राप्त झाले तसेच संजय गांधी निराधारमध्ये एस.सी.समाजाच्या लाभार्थींसाठी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांचे अनुदान प्राप्त झाले आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या एस.टी.प्रवर्गातील लाभार्थींसाठी जुलै या एक महिन्यांचे अनुदान आले आहे. श्रावण बाळ योजनेतील जनरल व एस.सी.लाभार्थींसाठी जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्यांचे अनुदान प्राप्त झाले तर श्रावण बाळ एस.टी.योजेनच्या लाभार्थींसाठी जुलै या एक महिन्याचे अनुदान प्राप्त झाले तर केंद्र सरकारकडून येणारे इंदिरा गांधी योजनेच्या अपंग/विधवा/वृद्धपकाळ यांचे जुलै या एक महिन्यांचे अनुदान रावेर तहसील कार्यालयाला प्राप्त झाले आहे. हे अनुदान सर्व लाभार्थींसाठी खात्यावर वर्ग करण्यात आले.
-
भुसावळात डंपरची दुचाकीला धडक : वृद्धेचा जागेवरच मृत्यू
