जळगाव एसीबीतर्फे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त फलकांद्वारे जनजागृती


जळगाव : अँटी करप्शन ब्युरो विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त मंगळवारी सकाळी 11 वाजता जळगाव एसीबी कार्यालयात शपथ घेण्यात आली. पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांनी राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या संदेशाचे वाचन केले. यावेळी निरीक्षक संजोग बच्छाव, एएसआय दिनेशसिंग पाटील, एएसआय सुरेश पाटील, हवालदार अशोक अहिरे, हवालदार सुनील पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, नाईक मनोज जोशी, नाईक जनार्धन चौधरी, नाईक सुनील शिरसाठ,

कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, कॉन्स्टेबल महेश सोमवंशी, कॉन्स्टेबल नासीर देशमुख, कॉन्स्टेबल ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल प्रदीप पोळ यांची उपस्थिती होती.

शहरात फलकांद्वारे जनजागृती
मंगळवारी जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौक, नवीन बस स्टँड, टॉवर चौक, नेरी नाका अशा ठिकाणी अँटी करप्शन ब्युरो यांच्याशी संपर्क साधण्याचे संपर्क क्रमांक, टोल फ्री क्रमांक व वेबसाईट नमूद असलेले मोठे फलक पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या उपस्थितीत लावण्यात आले. जळगाव शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये अँटी करप्शन ब्युरो विभागाचे संपर्क क्रमांक असलेले स्टीकर लावण्यात आले व गर्दीच्या ठिकाणी हॅण्डबिल वाटप करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !