मोबाईल दुकान फोडणारे चोरटे जाळ्यात
जळगावातील एमआयडीसी पोलिसांची यशस्वी कामगिरी
जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी येथील तरूणाचे मोबाईलचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तीन मोबाईलसह रोकड आणि मोबाईलच्या वस्तू चोरून नेल्या होत्या. या गुन्ह्यातील दोघा ारोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली. शुभम उर्फ बांडु शिवरात मिस्तरी (20, रा.वाल्मिक मंदीराजवळ जैनाबाद) आणि राहुल रवींद्र कोळी (19, रा.जैनाबाद) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून अटक
सुभाष सुरेशचंद जैन (38, रा.सुप्रिम कॉलनी) यांचवा मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे. जळगाव औरंगाबाद महामार्गावरील आर.एल. चौफुलीवर पार्टीशन पत्र्याचे मोबाईल दुकान आहे. 27 सप्टेंबर रोजी रात्री 10 ते 28 सप्टेंबर 2021 दरम्यान सकाळी 7 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोबाईलचे बंद दुकान फोडून दुकानातील तीन मोबाईल, 2 हजाराची रोकड आणि मोबाईल असेसरीज असा एकुण 8 हजार 500 रूपयांची मुद्देमाल लांबवला होता. या प्रकरणी सुभाष जैन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिसांनी संशयीत आरोपी शुभम उर्फ बांडु शिवरात मिस्तरी (20, रा.वाल्मिक मंदीराजवळ, जैनाबाद) आणि राहूल रवींद्र कोळी (19, रा.जैनाबाद) यांना सोमवार, 25 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता अटक केली. यातील शुभमकडून दीड हजार रूपये किंमतीचा चोरीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. या गुन्ह्यात आणखीन एका आरोपीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, सचिन पाटील, मुकेश पाटील यांनी कारवाई केली. दोन्ही संशयित आरोपींना मंगळवारी न्यायमूर्ती शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
