म्हसावदला वाहनाच्या धडकेत महिला जखमी
जळगाव : तालुक्यातील म्हसावद येथील महिला पायी जात असतांना भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने पायाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. याप्रकरणी वाहन चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलकाबाई डिगंबर उशीर (50, रा.बोरणार ता.जि. जळगाव) या आपल्या कुटुंबियांसह राहतात. अलकाबाई उशीर या रविवार, 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता कामाच्या निमित्ताने रस्त्याने गिरणी नदीच्या पुलाजवळ पायी जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारे वाहन (एम.पी.09 बी.डी. 6927) वाहनाने धडक दिली. या धडकेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी जळगावात खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. अलकाबाई उशीर यांच्या जबाबावरून गुरूवार, 28 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक स्वप्नील पाटील करीत आहे.
