माजी नगरसेवकाचा मृत्यू : दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
पारोळा : शहरातील माजी नगरसेवक रवींद्र चौधरी यांचा दुचाकीवरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणी शनिवारी पोलीस तापासावरून दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दुचाकीस्वाराविरोधात दाखल झाला गुन्हा
माजी नगरसेवक रवींद्र चौधरी हे शेतातून भैय्या सुदाम चौधरी यांच्या मोटार सायकल बसून घरी येत होते. धरणगाव रस्त्यावरील योगेश चौधरी यांच्या शेताजवळ कुत्रे आडवे आल्याने मोटारसायकल घसरून रवींद्र चौधरी खाली कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांना कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. याबाबत शिवदास चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून व पोलीस तपासावरून मोटारसायकल चालक भैय्या चौधरीविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास हवालदार विनोद साळी हे करीत आहेत.

