विषारी सर्पाच्या दंशाने बैलाचा मृत्यू


अमळनेर : तालुक्यातील शिरूड येथील घराच्या अंगणात बांधलेल्या बैलाला गुरुवार, 28 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सर्पदंश झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. शेतीच्या कामाच्या दिवसात बैलाच्या मृत्यू मुळे हळहळ व्यक्त करण्यात आली.

विषारी सर्पाच्या दंशाने बैलाचा मृत्यू
शिरूड येथील रहिवासी भैय्या साहेबराव पाटील यांच्या अंगणात त्यांचा मालकीचा बैल बांधलेला होता परंतु सायंकाळी सात वाजेच्या सुमारास बैल अचानक जागेवर पडल्याचा आवाज आल्याने त्यांनी बाहेर येऊन बघितले असता बैल त्यांना निपचित पडलेला दिसला व त्याच्या तोंडातून फेस निघत असल्याने त्यास कुठल्यातरी विषारी जातीच्या सर्पाने त्यास दंश केल्याचे लक्षात आले. गेल्या काही दिवसांपासून भैय्या पाटील यांच्या घराच्या अंगणात बांधलेल्या बैल जोडीतील एक बैल रात्री चोरांनी सोडून नेला होता.तर त्याच जोडीमधील एका बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने ऐन शेतीच्या कामांची लगबग असतांना बैलाची जोडी गमविल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !