जळगावात तरुणाला बेदम मारहाण : दुचाकीला कट लागल्याचे निमित्त


जळगाव : दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून तरूणाला शिवीगाळ करून बेदम मारहाण केल्याचा प्रकार अग्रवाल हॉस्पीटलजवळ घडला. याप्रकरणी दोन जणांवर जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव शहरातील अग्रवाल हॉस्पिटल जवळील बोगद्याजवळून सचिन धनराज पाटील (26, रा.बालाजी पेठ, जळगाव) हा दुचाकी (क्रमांक एम.एच.19-9402) ने कामानिमित्त एम.जे. कॉलेजकडे जात असतांना बोगद्याजवळ समोरून विश्वदिप कैलास सोनवणे (पूर्ण नाव माहिती नाही) यांची दुचाकी (एम.एच. 19 यू.3149) ला कट लागला. या कारणावरून विश्वदीप आणि सोबत डंपरचालक रत्नदीप (पुर्ण नाव माहित नाही) या दोघांनी शिवीगाळ करून सचिन पाटील याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. जखमी सचिनला खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सचिनच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रत्नदीप आणि विश्वदीप कैलास सोनवणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.निरीक्षक प्रदीप चांदेलकर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !