युपीतील तरुणाने जळगावातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


जळगाव : शहरातील रेल्वे लाईन परीसरातून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयीत आरोपीविरोधात गुन्हा
आव्हाणे शिवारातील रेल्वे लाईन जवळील आर.एन.दुध संकलन केंद्राजवळ 14 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. 24 ऑक्टोंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास राहत्या घराजवळून अजय पप्पु सोनकर (रा.करंदा, ता.मडीहान, जि. मिर्झापूर, उत्तरप्रदेश, ह.मु.आर.एन.दुध संकलन केंद्र जळगाव) याने अल्पवयीन तरुणीनला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी अजय सोनकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार अनिल तायडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !