मासुमवाडी परीसरात घरफोडी : आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव : शहरातील मासुमवाडी परीसरातील सय्यद असरार नगर येथे मध्यरात्री घरातून दोन मोबाईलसह रोकड असा एकूण 55 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेणार्या संशयीताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. वसीम कबीर पटेल (22, रा.नशेमन कॉलनी, मास्टर कॉलनी, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अन्य चोर्या उघडकीस येण्याची शक्यता
शेख सलीम शेख रशीद (वय 47) हे ब्रोकर आहेत. सोमवार, 1 नोव्हेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे शेख सलीम व त्यांचे कुटुंब झोपले. मध्यरात्री चोरट्यांनी मुख्य दरवाजाची आतून लावलेली कडी उघडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील 2 मोबाईल, 25 हजार रुपये रोख, 23 हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या 12 अंगठ्या, 8 ग्रॅमचे चांदीचे पेंडल व 3 तीन लहान पितळी भांडे असा 55 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. मंगळवारी सकाळी 6 वाजेच्या सुामरास शेख सलीम शेख रशीद हे उठले असता, दरवाडा उघडा तर घरात सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. चोरीची खात्री झाल्यावर शेख सलीम यांनी याबाबत एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.

