जळगाव तहसील आवारातून एकाचा मोबाईल लंपास


जळगाव : शहरातील तहसील कार्यालय परीसरातून तरूणाचा 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञातांनी लांबवला मोबाईल
किरण नारायणराव देशमुख (32, रा.शिवधाम मंदीराजवळ, जळगाव) हा तरूण शिक्षण घेत आहे. कामाच्या निमित्ताने बळीराम पेठेतील जळगाव तहसील कार्यालयात 1 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आला होता. दरम्यान, त्यावेळी त्यांच्या खिश्यातील 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. थोड्या वेळाने आपल्या खिश्यातील मोबाईल चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. परीसरात शोधाशोध केली परंतू मोबाईल आढळून आला नाही. या प्रकरणी तरूणाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक गजानन बडगुजर करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !