आशेचे दीप विझले : जामनेर तालुक्यात वेगवेगळ्या घटनेत दोघांच्या आत्महत्या
जामनेर : ऐन दिवाळी सणाच्या उत्साहात वेगवेगळ्या घटनेत तालुक्यात दोघांनी आत्महत्या केल्याची घटना जामनेर तालुक्यात घडल्या. पहिल्या घटनेत जामने तालुक्यातील सामरोद येथील 25 वर्षीय तरूण शेतकरी योगेश सदाशीव धुंदाळे यांनी आत्महत्या केली तर दुसर्या घटनेत खादगाव येथील 21 वर्षीय तरुणी पूजा निवृत्ती पाटील (21) हिने गळफास घेत आत्महत्या केली. ऐन दिवाळी सारख्या प्रकाश पर्वाच्या दिवशी घडलेल्या घटनांनी हळहळ व्यक्त करण्यात आली.
