मोठी बातमी : आर्यन खान प्रकरणातून समीर वानखेडेंना हटवले


मुंबई : आर्यन खानवर कारवाई केल्यानंतर देशभरात प्रकाशझोतात आलेल्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांना या केसच्या प्रकरणातून हटवण्यात आल्यानंतर खळबळ उडाली आहे. क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खानवर कारवाई केल्यानंतर अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आले होते. एनसीबीने या प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व करणारे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना तपासातून काढून टाकले आहे. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी समीर वानखेडेवर आठ कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास वरीष्ठ पोलीस अधिकारी संजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे.

वानखेडे मात्र मुंबईचे झोनल डायरेक्टर
मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेतला असला, तरीदेखील ते मुंबईचे झोनल डायरेक्टर म्हणून कायम राहणार आहेत. आता एनसीबीचे केंद्रीय पथक आर्यन खान आणि समीर खानच्या प्रकरणांची चौकशी करू शकते, असे बोलले जात आहे. आर्यन प्रकरण दुसर्‍या अधिकार्‍याकडे वर्ग झाल्याने राजकीय वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.





मलिक म्हणाले : ही तर सुरूवात
महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी ही फक्त सुरुवात आहे, व्यवस्थेला मुळापासून साफ करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. समीर वानखेडे यांना पाच प्रकरणांमधून काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी ट्विट करुन लिहिले आहे. आणखी 26 प्रकरणांचा तपास बाकी आहे. ही फक्त सुरुवात आहे, व्यवस्था मुळापासून पुसली जाईल, असे ते आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !