चोरटे पुन्हा सक्रिय : जळगावातून दुचाकी लांबवली


जळगाव : शहरातील कांचन नगरातून १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीला आली. या प्रकरणी शनीपेठ पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दुचाकी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल
शहरातील कांचन नगरातील रहिवासी एकनाथ शंकर राजपूत (४६) हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. बांधकामाच्या ठिकाणी हातमजूरीचे काम करतात. कामाला जाण्यासाठी त्यांच्याकडे (एम.एच.१९ ए.झेड. २१७५) क्रमांकाची दुचाकी आहे. ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता ते कामावरून दुचाकीने घरी आले. दुचाकी घराच्या समोर पार्किंग करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. एकनाथ राजपूत यांनी परीसरात दुचाकीची शोधाशोध केली परंतु आढळून आली नाही. दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी त्यांनी शनीपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात शनीपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय निकम करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !