पहूर शेंदूर्णी येथील शेतात अनोळखीची आत्महत्या
पहूर, ता.जामनेर : पहूर शेंदुर्णी रोडवर सांगवी शिवारात शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास अनोळखी व्यक्तीने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. शेतकरी ईश्वर नामदेव क्षीरसागर यांच्या शेताचे बांधावरील असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. मयत इसमाची ओळख पटलेली नाही. ओळख पटवण्याचे आवाहन पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी केले आहे.
