गोव्याच्या सहलीत करंजच्या शेतकर्‍याच्या हृदयविकाराने मृत्यू


जळगाव : जिल्हा बँकेसाठी होवू घातलेल्या निवडणुकीसाठी काहकी मतदार पर्यटनासाठी गोव्यात गेले असून त्यातील करंजच्या शेतकर्‍याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी गोव्यात घडली. देवकीनंदन विठ्ठल पाटील (45, करंज) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे. 47 जण शनिवारी गोव्यासाठी रवाना झाले होते मात्र अचानक पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
करंज विकास सोसायटीमधून देवकीनंदन पाटील यांचे वडील विठ्ठल पाटील यांचा ठराव झाला होता. सहलीसाठी विठ्ठल पाटील यांच्यासोबतच देवकीनंदन पाटील हे देखील रवाना झाले होते. देवकीनंदन पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले व मुलगी आहे. मंगळवारी सायंकाळी गोव्याहून एअर अ‍ॅम्ब्युलन्सने त्यांचा मृतदेह औरंगाबाद येथे तर येथून अ‍ॅम्बुलन्सने मृतदेह आणून रात्री उशिरा करंज आणल्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !