नवाब मलिकांविरोधात घोषणाबाजी : चाळीसगावातील भाजपाच्या पदाधिकार्यांविरोधात गुन्हा
चाळीसगाव : अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांच्याविरोधात घोषणाबाजी करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघण केल्याप्रकरणी भाजपच्या चाळीसगाव येथील 10 पदाधिकार्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी रात्री भाजपा पदाधिकार्यांनी मंत्री मलिक यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. या प्रकरणी पोलीस नाईक भटू पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरुन भाजपा शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, तालुकाध्यक्ष सुनील निकम, अमोल नानकर, संजय भास्करराव पाटील, जितेंद्र वाघ, सदानंद चौधरी, सोमसिंग राजपूत, भावेश कोठावदे यांच्यासह 10 कार्यकर्त्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
