प्लॅट घेण्यासाठी दहा लाख न आणल्याने विवाहितेचा छळ : पतीसह पाच आरोपींविरोधात गुन्हा
चाळीसगाव : फ्लॅट घेण्यासाठी माहेरून दहा लाख (10 Lakh) रुपये न आणल्याने चाळीसगावातील (Chalisgaon) विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
नाशिकच्या आरोपींविरोधात गुन्हा
(Chalisgaon) शहरातील शिंदी कॉलनीतील सोनम विनय दुसाणे ( 30) या विवाहितेचा लग्न नाशिक (Nashik) येथील विनय प्रकाश दुसाणे यांच्याशी झाला मात्र सुरूवातीला पतीसह सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. त्यानंतर पुणे येथे फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 10 लाख रुपये आणावेत म्हणून पती व सासरच्या सदस्यांकडून शारीरिक व मानसिक छळवणूक करण्यात आली. या सगळ्या गोष्टींला कंटाळून सोनम या आपल्या आई-वडिलांकडे चाळीसगावात आल्या. 25 जून 2019 ते 26 सप्टेंबर 2020 या कालावधीत तिला अमानवी वागणूक देण्यात आल्याने या मानसिक त्रासाला कंटाळून सोनम हिने चाळीसगाव (Chalisgaon) शहर पोलिस स्थानक गाठून पतीसह सासु- सासरे, दिर, मावस सासरे व मावस सासु यांच्याविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस हवालदार किशोर सोनवणे हे करीत आहेत.

