नशिराबादजवळ अपघात : डंपरने दुचाकीला उडवल्याने एक जागीच ठार तर दोघे गंभीर
जळगाव : भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाला. तालुक्यातील नशिराबाद येथे गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. विशाल उर्फ विकी रमेश रंधे (25, सिद्धार्थ नगर, नशिराबाद) असे मयताचे नाव आहे.
अपघाताचे सत्र कायम
नशिराबाद शहरातील सिद्धार्थ नगरातील विशाल उर्फ विकी रमेश रंधे (25), रोहित दगडू इंगळे (25), उदय भगवान बोदडे (23) असे तिघे दुचाकी (एम.एच.19 डी.एस.8692) वरून गुरुवारी रात्री 12 वाजेनंतर घरी येत असताना महामार्गावरील उड्डाण पुलाखालून सुनसगावकडे जाणारा डंपर (एम.एच.19 झेड.4748) ने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात विशाल उर्फ विकी रमेश रंधे याचा जागीच मृत्यू झाला तर रोहित इंगळे आणि उदय बोदडे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील रोहित इंगळे याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.



