चाळीसगाव तालुक्यात अल्पवयीन बालिकेवर अत्याचार

अत्याचारातून अल्पवयीन बालिका गर्भवती : मेहुणबारे पोलिसात गुन्हा वर्ग : आरोपीला अटक


चाळीसगाव : चाळीसगाव तालुक्यातील एका गावात प्रेमसंबंध निर्माण करण्यात आल्यानंतर 15 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करण्यात आला व त्यातून पीडीता गर्भवती राहिली. या प्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. हा गुन्हा मेहुणबारे पोलिसात वर्ग झाला आहे.

मेहुणबारे पोलिसात गुन्हा वर्ग
संशयीत आरोपी मनोज ऊर्फ सोनू जिभाऊ निकम (रा.शिरसगाव) याने अहमदनगर जिल्ह्यातील एका गावातील 15 वर्षीय बालिकेशी प्रेमसंबंध निर्माण केले व एप्रिल ते मे 2021 या कालावधीत तिच्यावर तालुक्यातील शिरसगाव येथे अत्याचार केल्याचा आरोप आहे. बालिका 28 आठवड्यांची गरोदर राहिल्यानतंर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी लोणी, ता.कोेपरगांव, जि. अहमदनगर, येथे भादंवि कलम 376,376(2) यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हा गुन्हा मेहुणबारे पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक पवन देसले यांनी सांगितले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !