जामनेरच्या महिलेची रेल्वे प्रवासात महिलेची पर्स लांबविली


भुसावळ : एलटीटी गोरखपूर एक्स्प्रेसमधून डी-2 या डब्यातून प्रवास करीत असलेल्या महिला प्रवाशाची पर्स चोरट्यांनी लांबवल्याची घटना गुरूवारी घडली. याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेसमधून डी-2 या डब्यातून प्रवास करीत असलेल्या एका महिलेची पर्स गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी लांबविली. ही घटना नाशिक रेल्वे स्थानकाजवळ गुरूवारी घडली. महिला प्रवासी सचिन सोनार (रा.जामनेर) यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा नाशिक लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !