भुसावळात उद्या टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी


भुसावळ : महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची आठवी 14 वर्षाच्या आतील व 19 वी 17 वर्षातील (सब- जुनियर) गटातील मुला/ मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा कोल्हापूर येथे 18 ते 20 नोव्हेंबर 2021 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी रविवार, 14 रोजी नाहाटा महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी 12 वाजता होणार आहे. 14 वर्षासाठी मंगळवार, 30 नोव्हेंबर 2007 व 17 वर्षासाठी मंगळवार, 30 नोव्हेंबर 2004 नंतर व जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे व अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल, राहुल कोळी, प्रतीक कुलकर्णी, विकास पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रा.आनंद उपाध्याय, गोपाल जोनवाल, श्याम भारंबे यांनी केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !