आयजींच्या पथकाची सत्रासेन शिवारात कारवाई : दोन पिस्टलासह युपीतील आरोपी जाळ्यात


चोपडा : नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षकांच्या पथकाने चोपडा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने कारवाई करीत एका संशयीताला दोन गावठी कट्ट्यासह पकडल्याने अवैधरीत्या शस्त्र विक्री करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली. ही कारवाई शुक्रवार, 12 रोजी सायंकाळी सत्रासेन शिवारात उत्तमनगराजवळ करण्यात आली. या प्रकरणी जगपालसिंग अजबसिंग पवार (44, हरीपूर, तहसील खेकडा जि.भागपथ, उत्तरप्रदेश) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून दोन पिस्टल, एक मॅगझीनसह एक रेनॉल्ट कंपनीची चारचाकी मिळून एकूण चार लाख साठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही बातमी वाचली का- रीक्षा व दुचाकी वाहनाची समोरासमोर धडक : दुचाकीस्वार ठार

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहा.फौजदार बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, नाईक मनोज दुसाणे, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, हवालदार लक्ष्मण शिंगाणे, नाईक रीतेश चौधरी, राकेश पाटील आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !