जळगावात विना परवानगी आंदोलन : राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा


जळगाव : राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर विना परवानगी आंदोलन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

फडणवीस यांच्या पुतळ्याचे केले होते दहन
राष्ट्रवादी कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी पोलीस प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही यामुळे याप्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांच्या विरोधात दाखल झाला गुन्हा
या प्रकरणी राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, रवींद्र नाना पाटील, मंगला पाटील, कल्पिता पाटील, सुशील शिंदे, सुनील माळी, डॉ.रीजवान खाटीक यांच्यासह 5 ते 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात पोलिस नाईक हर्षल सुभाष पाटील यांनी फिर्याद दिल्यानुसार रामानंद नगर पोलीस स्थानकात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !