कीर्तनकाराचे घर फोडले : अडीच लाखांचा ऐवज लंपास

चाळीसगावात चोरटे शिरजोर : बाहेरगावी जाताना पोलिसांना सूचित करण्याचे आवाहन


चाळीसगाव : किर्तनासाठी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोने, चांदीचे दागिने व 40 हजार रोकड असे 2 लाख 34 हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना शहरातील जयशंकर नगरात उघडकीला आली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बंद घर चोरट्यांच्या पथ्थ्यावर
शहरातील जयशंकर नगर येथील कीर्तनकार रवींद्र वसंतराव पाटील (5) हे 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता घराला कुलूप लावून परीवारासह किर्तन करण्यासाठी धुळे येथे गेले होते. किर्तन आटोपल्यानंतर रविंद्र पाटील हे कुटुंबासह त्यांच्या साडूकडे दोन दिवस थांबले. दरम्यान, पाटील हे रविवार, 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घरी परतले. तेव्हा घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी घराची पाहणी केली असता घरातील बेडरूममधील कॉटमध्ये ठेवलेले सोने, चांदी व 40 हजार रुपये रोकड असे एकूण 2,34000 रूपये अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे दिसून आले. रविंद्र वसंतराव पाटील यांनी तात्काळ चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून फिर्याद दिली. यानुसार भादंवि कलम- 380, 454 व 457 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सहा.निरीक्षक आव्हाड हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !