जळगावात श्री प्रभू श्रीरामांच्या जयघोषात रथोत्सवाला सुरूवात


जळगाव : जळगाव नगरीचे ग्रामदैवत व वारकरी संप्रदायाची थोर परंपरा लाभलेल्या श्रीराम मंदिर संस्थांतर्फे कार्तिकी एकादशीनिमित्त श्रीराम रथोत्सवाचे सोमवारी आयोजन करण्यात आले. पहाटे चार वाजता काकडा आरती व प्रभू श्री रामांच्या उत्सवमूर्तीस महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता श्रीराम मंदिर संस्थांनचे विश्वस्त गादीपती हभप मंगेश महाराज जोशी यांच्या हस्ते शारदा वेद पाठशाळा व शहरातील समस्त ब्रह्मवृंदांच्या वेदमंत्राच्या घोषात रथाची व उत्सवमुर्तीची महापुजा करण्यात आली व प्रभू श्रीरामांच्या जयघोषणात श्रीराम रथोत्सवाला सुरूवात झाली.

पंचक्रोशीतील भाविक दाखल
रथाचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांची सकाळपासूनच मांदियाळी सुरू आहे. त्यामुळे रथोत्सवाच्या मार्गाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होवून सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !