सूर्यास्तानंतरही आता करता येणार शवविच्छेदन : आरोग्य मंत्रालयाचा निर्णय
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सूर्यास्तानंतर शवविच्छेदन करण्याचा आता मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून देशात सूर्यास्तानंतरही मृतदेहांचे शवविच्छेदन करता येणार असून ज्या रुग्णालयांमध्ये रात्री शवविच्छेदन करण्याची सुविधा आहे, त्यांना आता सूर्यास्तानंतरही शवविच्छेदन करता येणार आहे. आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी ही महत्वाची माहिती दिली.
तर सूर्यास्तानंतरही होणार शवविच्छेदन




नवीन प्रोटोकॉलमध्ये असे नमूद केले आहे की, अवयवदानासाठी पोस्टमॉर्टेम प्राधान्याने केले जावे आणि नियमितपणे पोस्टमॉर्टेम करण्यासाठी पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये सूर्यास्तानंतरही पोस्टमॉर्टेम करता येईल. या निर्णयात आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, कोणत्याही प्रकारच्या शंका दूर करण्यासाठी आणि कायदेशीर कारणांसाठी रात्रीच्या वेळीही पोस्टमॉर्टेमचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाईल.