लग्नापूर्वीच भावी नवरदेवासह नवरीचा अपघाती मृत्यू


औरैया : लग्न निश्चितीनंतर खरेदीसाठी गेलेल्या भावी नवरदेवासह नवरीचा अपघात मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील औरेया इथं ह्दयद्रावक घटना घडली आहे. 10 डिसेंबरला या दोघांचे लग्न होणार होते. लग्नाच्या तयारीसाठी दोघंही खरेदी करायला कानपूरला गेले होते. परंतु घरी परतताना अज्ञात वाहनाने दोघं जात असलेल्या स्कूटीला जोरदार धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. युवक आणि युवतीच्या मृत्यूची बातमी कळताच दोन्ही कुटुंबीयांना जबर धक्का बसला. सचिन श्रीवास्तव आणि सोनी असे मयताचे नाव आहे.

10 डिसेंबर रोजी होणार होता विवाह
मृत सचिन श्रीवास्तव आणि सोनी एकाच परीसरात वास्तव्यास असल्याने त्यांच्यात प्रेम निर्माण झाले व दोघांना एकमेकांसोबत लग्न करायचं होतं म्हणून घरच्यांना सांगून दोघांनी त्यांना लग्नासाठी होकार मिळवला. वेगवेगळ्या जातीतील असल्याने सुरुवातीला दोघांच्या कुटुंबाने लग्नाला विरोध केला परंतु त्यानंतर मुलांच्या प्रयत्नाने ते दोन्ही कुटुंब तयार झाले. सचिन श्रीवास्तव हा सीबीआयमध्ये क्लार्क पदावर तैनात होता. दोघांचा साखरपुडा झाला होता. लग्नाची तयारी सुरु होती. परंतु या दुर्घटनेने आनंदाच्या वातावरणात दुखाचं विरजन पडलं आहे.





दुर्घटनेची माहिती मिळताच गावकरी हळहळले
युवक आणि युवतीच्या निधनाची बातमी करताच दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. जेव्हा दोघांचे मृतदेह घरी आणले तेव्हा अनेकांच्या अश्रूचा बांध फुटला. नातेवाईकांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर दोघांवर एकत्रच अंत्यसंस्कार करण्यात आले. वैवाहिक आयुष्याची स्वप्न पाहणार्‍या या दोघांच्या मृत्यूनं सर्व गावकरी हळहळले. पोस्ट मार्टमनंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह कुटुंबाला सोपवले. या अपघाताची पोलीस चौकशी करत आहेत. अज्ञात वाहनाचा शोध घेतला जात आहे. रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज पाहिले जात आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !