हेलिकॉप्टर दुर्घटना : संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू
डीएनए चाचणीच्या मदतीनं 13 मृतदेहांची ओळख पटवली जाणार
नवी दिल्ली : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत प्रवास करीत असलेल्या लष्कराच्या हेलिकॉप्टरला तमिळनाडूमध्ये अपघात झाल्यानंतर या अपघातात बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. डीएनए चाचणीच्या मदतीनं मृतदेहांची ओळख पटवली जाणार असल्याचं वृत्त एएनआयनं दिलं आहे.
Indian Air Force announces the demise of CDS General Bipin Rawat along with 12 others in chopper crash pic.twitter.com/8Ebrz6OoQZ
— ANI (@ANI) December 8, 2021




चॉपरमध्ये हे करीत होते प्रवास
सीडीएस बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासोबत लष्कराचे वरीष्ठ अधिकारी प्रवासी करीत असलेले हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी पाऊणच्या सुमारास तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये कोसळलं. ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, लान्स नायक साई तेजा आणि हवालदार सत्पाल अपघातावेळी हेलिकॉप्टरमध्ये हजर होते. या सर्वांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.
13 of the 14 personnel involved in the military chopper crash in Tamil Nadu have been confirmed dead. Identities of the bodies to be confirmed through DNA testing: Sources
— ANI (@ANI) December 8, 2021
कोर्ट ऑफ इन्क्वॉयरी होणार
आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परीसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर, तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली. या हेलिकॉप्टर अपघाताची कोर्ट ऑफ इन्क्वायरी करण्यात येणार आहे. सीडीएस जनरल बिपीन रावत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर पचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती संरक्षण दलाने अधिकृतरीत्या दिली आहे.
अधिकार्यांची घटनास्थळी दाखल
हे हेलिकॉप्टर नेमकं कसं दुर्घटनाग्रस्त झालं त्याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या हेलिकॉप्टरमध्ये 14 जण प्रवास करत होते मात्र या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. या घटनेची माहिती समजताच जिल्हाधिकारी आणि लष्कराचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी सहा रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत.
अपघाताचे कारण अस्पष्ट
लष्कर वापरत असलेलं एमआय-17 व्ही-5 हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित मानलं जातं. रशियन बनावटीच्या या चॉपरमध्ये दोन इंजिन असतात. व्हिआयपींच्या प्रवासासाठी या विमानाचा वापर केला जातो. व्हिआयपी या विमानातून उड्डाण करण्यापूर्वी अनेक प्रोटोकॉल्स पूर्ण केली जातात. विमानाची देखभाल, हवामान यांची अनेकदा पडताळणी केली जाते. मात्र तरीदेखील हा अपघाताचं नेमकं कारण काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
